लैंगिक छळ हा शारीरिक, मानसिक आणि शाब्दिकही... हे तुम्हाला माहीत आहे का?


सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेकडे पाहून असभ्य गाणं गुणगुणत इशारे करणं हादेखील लैंगिक छळाचा एक भाग आहे. आयपीसी कलम २९४ प्रमाणे गुन्हेगाराला तीन महिन्यांची कैद किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं. 

- एखाद्या महिलेकडे बळजबरीनं लैंगिक सुखाची मागणी करणं हादेखील आयपीसी कलम ३५४ (ए) प्रमाणे गुन्हा आहे. दोषीला १ - ३ वर्षांपर्यंत कैद किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.


- एखाद्या महिलेचा तिच्या कळत-नकळतपणे मागोवा घेणं, तिला फॉलो करणं गुन्हेगाराला महागात पडू शकतं, कारणं हा देखील आयपीसी कलम ३५४ (डी) प्रमाणे गुन्हा आहे. दोषीला दंडासहीत ३-५ वर्षांची शिक्षा होऊ शकते. 


- लैंगिक सुखाच्या मागणीला एखाद्या महिलेनं दिलेल्या नकारामुळे तिच्या शारीरिक, प्रतिष्ठा किंवा मालमत्तेला हानी पोहचवणं किंवा तशी धमकी देणं हा देखील गुन्हा आहे. (आयपीसी कलम ५०३) दोषी पुरुषाला २ वर्षांपर्यंत तुरुंगवास, दंड किंवा दोन्हीही होऊ शकतं.

कामाच्या ठिकाणी प्रमोशनसाठी किंवा पगारवाढीसाठी एखाद्या वरिष्ठ सहकाऱ्यानं लैंगिक सुखाची मागणी करणं हा लैंगिक छळ आहे. (विशाखा गाईडलाईन्स)

एखाद्या महिलेच्या फोटोशी छेडछाड करणं आणि तो महिलेचा छळ करणं किंवा तिच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवण्यासाठी इतरांशी शेअर करणं हादेखील लैंगिक छळाचा एक भाग आहे.

सार्वजनिक ठिकाणी एखाद्या महिलेवर आक्षेपार्ह आणि लैंगिक कमेंटस् करणंही तुम्हाला भोगावं लागू शकतं. 

 चुकीच्या उद्देशानं एखाद्या महिलेला तिच्या परवानगीशिवाय स्पर्श करणं हादेखील गुन्हा आहे.

ऑफिसनं दिलेल्या ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीच्या गाडीमध्ये असा काही प्रकार घडल्यानंतरही तुम्ही 'कामाच्या ठिकाणी महिलेचा लैंगिक छळ कायदा, २०१३'नुसार तक्रार नोंदवू शकता.

लैंगिक छळाची तक्रार करणं हा तुमचा हक्क आहे. याविषयी तुम्ही कोणत्याही नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार (FIR) नोंदवू शकता
 याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग या वेबसाईट वर जाऊन तुमची तक्रार देऊ शकता.

Comments

Popular posts from this blog

मृत्यूपत्र बनवणं का गरजेचं आहे?

पुरुषांच्या रक्षणासाठी....

हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली