हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली


हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली. आहे. हा प्रकार 27 मे 2022 ते 25 ऑक्टोबर 2023 दरम्यान गंगानगर हडपसर याठिकाणी घडला आहे. सुहास हिंगणे असे अटक केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. तर सासु शारदा हिंगणे, सासरे रोहिदास हिंगणे, नणंद अनुराधा जाधव, अमोल जाधव यांच्यावर आयपीसी 306, 498अ, 323, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोपट देविदास खंदारे (वय-47 रा. आष्टा ता. आष्टा, जि. बीड) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी पती सुहास हिंगणे व फिर्यादी यांची मुलगी कोमल यांचा विवाह मे 2022 मध्ये झाला आहे. लग्नानंतर आरोपी कोमल हिला घरगुती कारणावरुन शारीरिक व मानसिक त्रास देत होते. तसेच हुंड्याची मांगणी करुन तिला शिवीगाळ करन मारहाण (Beating) करत होते. आरोपींच्या त्रासाला कंटाळून कोमल सहास हिंगणे (वय 22) हिने 25 ऑक्टोबर रोजी राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

Comments